Onion Farmers : राज्यभरात सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rains) शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजा आता अधिक चिंतेत सापडला आहे. आखाती युद्धामुळे कांदा निर्यात मंदावली आहे. त्यामुळे कांद्याला भाव मिळणं तर दूरच मात्र लागलेला खर्चही मिळणं अवघड झालं आहे. दुसरीकडे अस्मानी संकाटाने बळीराज्याचं (Onion farmers) पुरतं कंबरडं मोडलं आहे. अशातच बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 73 गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये मिळाले आहेत. म्हणजेच कांद्याला प्रतिकिलो 50 पैसे हा कावडी मोल भाव मिळाला आहे.
Onion Farmers : कांद्याला भाव मिळत नसल्याने पश्चिम विदर्भातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत
दुसरीकडे, पश्चिम विदर्भातील तापमान हे 45 अंशापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याच चित्र आहे. वाढत्या तापमानामुळे कांद्याचा दर्जा खालावत असल्याने व कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. सध्या पश्चिम विदर्भात कांद्याला साडेचारशे ते साडेपाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत तो भाव कमी असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. शिवाय सातत्याने होत असलेल्या अवकाळी पाऊस, वादळ, यामुळे कांदा भिजल्याने सडत असल्याचे चित्र आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीचा सामना करत आहे. दरवर्षी कांदा लागवड करूनही भाव मिळत नसल्याने दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील कांदा उत्पादन क्षेत्र घटक असल्याची ही माहिती आहे.
Solapur : काय रे देवा! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 73 गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये मिळाले आहेत. अंकुश गुंजाळ यांनी आपल्या शेतात कष्टाने पिकवलेला कांदा 21 एप्रिल 2026 रोजी सोलापूरच्या शरीफ ट्रेडर्स’ या आडत दुकानावर विक्रीसाठी आणला होता. एकूण 73 पिशव्या (पोती) कांदा त्यांनी विक्रीसाठी लावला होता. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने आणि मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ 50 पैसे इतका नीचांकी भाव मिळाला.
Onion Farmers : कांद्याला मिळाला फक्त प्रतिकिलो 50 पैसे भाव
मिळालेल्या पट्टीनुसार, कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम आणि त्यावर झालेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. 73 पिशव्या कांदा विकल्यानंतर अंकुश गुंजाळ शेतकऱ्याला एकूण 5068 रुपये मिळाले होते. वाहतुकीचे गाडी भाडे, हमाली, तोलाई आणि इतर आडत खर्च वजा जाता, प्रत्यक्षात शेतकऱ्याला केवळ 400 रुपये म्हणजे 50 पैसे किलो भावाने पैसे मिळाले आहेत.


