Bahujan parv

काळाचा क्रूर घाला! लाडक्या लेकीचं कन्यादान करतानाच पित्याचा दुर्दैवी अंत; बुलढाण्यातील लग्नमंडपात पसरली शोककळा

Buldhana news Buldhana news
Spread the love

 : सनई चौघडांचे मंजुळ सूर, मंगलाष्टकांचे स्वर, डीजेचा दणदणाट, आनंदाने उपस्थित असलेले वऱ्हाडी, पाहुणे अशा मंगलमय वातावरणात मुलीचा  (Buldhana News) विवाह सोहळा पार पडला. मात्र बिदाई करण्यापूर्वीच कन्यादानावेळी वधु पित्याचा हृदयविकाराने दुर्दैवी  (Buldhana News) मृत्यू झाल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी या गावात काल (बुधवारी, ता13) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. कुरूमदास कुंडलिक भुतेकर (50) अस या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. (Buldhana News)

कुरूमदास कुंडलिक भुतेकर (50) यांची कन्या नंदिनीचा विवाह (बुधवारी, ता13) सायंकाळी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असलेला प्रदीप नानोटे यांच्याशी पार पडला. मात्र नियतीला काही वेगळच मान्य होतं….! मंगलाष्टक झाली आणि त्यानंतर कन्यादानाच्या वेळी अचानक कुरुमदास यांच्या छातीत दुखू लागलं व त्याच ठिकाणी ते कोसळले. उपस्थितांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं मात्र उशीर झाला होता…त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल. कुरुमदास यांची गेल्या डिसेंबर मध्येच बायपास शस्त्रक्रिया झाली होती. मात्र आपल्या लाडक्या लेकीच्या कन्यादानात त्यांना मृत्यूने गाठल्याने परिसरात समाजमन सुन्न झालं आहे व हळहळ व्यक्त होत आहे. (Buldhana News)

कुरूमदास कुंडलिक भुतेकर यांचे पुतणे कैलास भुतेकर, यांनी सांगितलं की, आमच्या घरी लग्न असताना माझे चुलते कुरूमदास कुंडलिक भुतेकर (50) यांचं लग्न झाल्यानंतर कन्यादान करत असतानाच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. भुतेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला, ज्या दिवशी बहिणीचं लग्न झालं त्याच दिवशी काळाने घाला घातला. परवा ही घटना घडली, आपल्या मुलीचं कन्यादान करत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. त्यांना त्यांच्या मुलीच लग्न मोठ्या थाटामाटात करायचं होतं, सगळी तयारी केली, हळदी झाल्या, विधी झाल्या पण कन्यादान करतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Buldhana News)

लग्नाच्या आनंदोत्सवात काही क्षणांतच दुःखाचं सावट पसरलं. एका बाजूला नववधूच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात होत होती, तर दुसऱ्या बाजूला तिच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. वऱ्हाडी, नातेवाईक आणि गावकरी काही वेळासाठी स्तब्ध झाले. लग्नमंडपात सुरू असलेला जल्लोष क्षणात शोकसभेत बदलला. आपल्या मुलीच्या लग्नासाठी कुरूमदास भुतेकर यांनी मोठ्या उत्साहाने तयारी केली होती. मात्र कन्यादान करतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि भुतेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

या घटनेमुळे वरदडी गावात हळहळ व्यक्त होत असून, भुतेकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी कुरूमदास भुतेकर हे मनमिळावू आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. आपल्या लेकीचा संसार आनंदात सुरू व्हावा, हीच त्यांची इच्छा होती. मात्र नियतीने वेगळाच खेळ खेळला. मुलीच्या लग्नाचा दिवस आयुष्यभर लक्षात राहील, पण त्या आनंदासोबत वडिलांच्या निधनाचं दुःखही कायम मनात राहणार असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *