कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
Onion Farmers : राज्यभरात सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rains) शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजा आता अधिक चिंतेत सापडला आहे. आखाती युद्धामुळे कांदा निर्यात मंदावली आहे. त्यामुळे कांद्याला भाव मिळणं तर दूरच मात्र लागलेला खर्चही मिळणं अवघड झालं आहे. दुसरीकडे अस्मानी संकाटाने बळीराज्याचं (Onion farmers) पुरतं कंबरडं मोडलं आहे. अशातच बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 73 गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400…


