सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट ‘ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं

नाशिक धर्मांतरण प्रकरण हा द्वेष भावनेतून केलेला प्रकार आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेली निदा खान हिच्याबाबतही असाच प्रकार घडत आहे. तिच्यावर केवळ आरोप झाले म्हणून तिची मिडिया ट्रायल करुन तिला दोषी ठरवण्याचा प्रकार सुरु आहे. मात्र, आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. न्यायालय या मुलीला निर्दोष ठरवेल, असा विश्वास असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. तसेच हा सगळा प्रकार सुशिक्षित मुस्लीम मुलामुलींना त्रास देण्यासाठी करण्यात आला आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. ते शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.